धक्कदायक! प्रियकराला भेटायला गेली अन् मित्रांनीच घेतला फायदा ..

Pune Crime

प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा तिच्याच मित्रांनी सामुहिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.पिडित महिलेने या प्रकरणी घोडेगाव (Ghodegaon) पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून तक्रारीवरुन पोलिसांनी संदेश जाधव, संजय, आदेश जाधव आणि चंद्रकांत भालेराव या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना याप्रकरणी एकजणाला अटक करण्यात यश आले आहे. तर उर्वरित तीन जणांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. (Latest Marathi News)

अजित पवार यांची ‘ती’ भीती झाली खरी! पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे (Pune Crime) जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ही घटना आहे. २३ जून रोजी पीडित २२ वर्षीय विवाहिता महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्या प्रियकराच्या ४ मित्रांनी तिला पाहिले. तिचा पाठलाग करून त्यांनी तिला निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला. तसेच या प्रकरणाची कोणाला माहिती दिली तर तिला जीवे मारले जाईल, अशीही धमकी दिली. (Crime News)

मुंबईमध्ये तुफान पाऊस, 2 जणांचा मृत्यू, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

नुकताच पुणे जिल्हा एमपीएसीमध्ये राज्यात आलेल्या दर्शना पवार हिच्या हत्येमुळे चांगलाच हादरला आहे. या प्रकरणाचा शोध सुरु आहे तोच विवाहितेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी (Ghodegaon Police Station) या प्रकरणी एक जणाला अटक केली असून तीन जणांचा शोध सुरु आहे.

75 व्या वर्षी तिला हवा होता जोडीदार पण… लग्नाच्या नावाखाली महिलेची लाखो रुपयांची फसवणूक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *