धक्कदायक! दवाखान्यासाठी पैसे नाहीत म्हणून तरुणाने केले भयानक कृत्य

Crime

सध्याच्या काळात पैशाला (Money) खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणतीही गोष्टी आपण पैशाशिवाय खरेदी करू शकत नाही. जर तुम्ही कष्ट केले तरच तुम्हाला त्याचा मोबदला मिळतो. सध्या लुटमारी, फसवणुक यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कारण जर पैसे नसतील काहीजण कोणत्याही थराला जाऊ शकतात. दवाखान्यासाठी पैसे नव्हते म्हणून एका तरुणाने धक्कदायक कृत्य केल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

जनतेच्या शापामुळे समृद्धी महामार्गावर अपघात झाला’ संजय राऊत यांचा राज्य सरकारवर धक्कादायक आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कदायक घटना नागपूरमध्ये (Nagpur) घडली आहे. स्वतःच्या उपचारासाठी पैसे नसल्याने एका तरुणाने थेट बाईकवर डल्ला मारला आहे. नागपूर येथील सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या रामदासपेठ भागातून एका बाईकची चोरी (Bike theft) झाली. या बाईकचा शोध घेताना पोलिसांना एक जण गाडीला धक्का मारताना दिसला. त्यावरून पोलिसांनी चौकशी केली असता धक्कदायक माहिती समोर आली.

मुख्यमंत्री सुडाचं राजकारण करतात’; ठाण्यातील राजकारणावरून जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

घरात आई आजारी आहे आणि स्वतःच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पाच बाईकची चोरी केली अशी कबुली आरोपीने पोलिसी खाक्या दाखवल्यावर दिली. चोरीच्या पाठीमागचे कारण समजताच पोलिसांनाही धक्का बसला आहे. उपचारासाठी अमरावती, वरुड, नागपूर या वेगवेगळ्या भागातून त्याने या बाईकची चोरी केली आहे.

बिग ब्रेकिंग! राजकीय हालचालींना वेग, शिवसेनेतील ‘या’ बड्या मंत्र्यांना मिळणार डच्चू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *