
Viral News । एक महिला प्रथम स्वत: चुकीच्या बाजूने कार चालवत आली आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली, धडक झाल्यानंतर तिनेच तरूणाला चप्पलने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एका तरुणाला सार्वजनिकरित्या मारहाण करण्यात आली. या घटनेने त्रस्त तरुण नैराश्यग्रस्त झाला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ही घटना घडली आहे. तरुणाने या घटनेबाबत लखनौच्या विभूतीखंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Vasant More । वसंत मोरेंनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विभूतीखंड पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी कामटा परिसर चौकाजवळ ही घटना घडली. आपण योग्य दिशेने जात असल्याचे पीडित तरुणाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अचानक एक महिला चुकीच्या बाजूने आली आणि भरधाव वेगात गाडी चालवत होती. अशा स्थितीत दोन्ही वाहने एकमेकांवर आदळली. या प्रकारामुळे महिलेला राग आला आणि तिने आधी शिवीगाळ केली आणि विरोध केल्यावर आरोपी महिलेने त्याला मारहाण केली.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला पीडितेला बाईकवरून कशी खेचत आहे आणि चपलाने मारहाण करत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे महिलेची ओळख पटली आहे.
Viral Video । चालू मेट्रोत घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ