नांदेड : परतीच्या पावसाने (rain) मराठवाड्यात देखील थैमान घातले आहे. या पावसाने शेतकरी (farmers) राजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, अशी परिस्थिती असतानाच नांदेड(Nanded) जिल्ह्यात नुकसानग्रस्त (Damaged) भागातील नुकसानीचे पंचनाम्याबाबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन उडीद, मूग ,कापूस ही हाताला आलेली पीकं मातीमोल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून त्या नुकसानभरपाईची (compensation) मागणी केली जात आहे.
अरे हे काय घडलं? पोलिसांना दंड घेण्याऐवजी भरावा लागला भुर्दंड; वाचा पुण्यातील किस्सा
दरम्यान, नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडे प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटना अशी घडली की, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोथळा गावात परतीच्या पावसामुळे पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान यामुळे पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीचे प्रतिनिधीनी आले होते. परंतु या विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी मात्र पिकांचे 100 टक्के नुकसान दाखवण्यासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
राज्यात पावसाचा कहर, अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर
अधिकाऱ्यांनी विम्याचे कागदपत्रे दिली फेकून
नांदेड जिल्ह्यातील याच कोथळा गावातील शेतकरी केशवराव नाजुराव देवसरकर यांच्या शेतात देखील मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी पीक विमा काढला.म्हणून विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतात जाऊन पाहणी केली. परंतु यावेळी मात्र विमा प्रतिनिधी यांनी पैश्यांची मागणी केली.पैशांची ही मागणी पूर्ण न केल्याने त्यांचे पीक विम्याचे कागदपत्र कंपनीच्या प्रतिनिधींनी अक्षरशः फेकून दिल्याचा आरोप देवसरकर यांनी केला आहे. दरम्यान अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईचा मोबदला जमा झाल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे.
लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरीच कृत्य पाहून नवरा अजूनही शॉकमध्ये, कारण…