धक्कादायक! एकाच रात्रीत 19 जणांना सापाने घेतला चावा; परिसरात भीतीचे वातावरण

sanke bite

राजस्थान (Rajasthan) येथील बाडमेर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या जिल्ह्यातील 19 जणांना साप चावला (Snake Bite) आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदावर राहावे की नाही? एकनाथ शिंदेनी दिले हे उत्तर,’ म्हणाले..

दरम्यान, या राज्यात बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biperjoy) कहर सुरु आहे. ठिकठिकाणी पुराचे पाणी साचले आहे. विजेचे खांब कोसळले असल्याने विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. पावसाचे पाणी बिळात शिरल्याने साप बाहेर येऊ लागले आहेत. बाडमेर जिल्ह्यातील धारासर, चाडार, नवातला जेतमाल गंगाला, उपरला तसेच खारिया राठोडान, सनाऊ, कापराऊ आणि सादुल या गावातील लोकांना सापाने चावा घेतला आहे.

आता छत्री घेऊनच घराबाहेर पडा, पावसाबाबत हवामान विभागाने दिली मोठी अपडेट; राज्यात कसं असेल हवामान?

एकाच वेळी एकूण 19 जणांना साप चावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. दरम्यान या वादळाचा चांगलाच फटका राजस्थानला बसला आहे. धरण फुटून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे आतापर्यंत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला असून अजूनही बचावकार्य सुरूच आहे.

पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना! पत्नीच्या जेवणात ड्रग्स मिसळून दुसऱ्या पुरुषांना…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *