Sharad Pawar । मोठी बातमी! ‘त्या’ ठिकाणी शरद पवार पुन्हा फिरवणार भाकरी

Sharad Pawar

Sharad Pawar । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election 2024) तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. लोकसभेमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व पक्ष आपापल्या पक्षात सभा घेत आहेत. अशातच खासदार शरद पवार पुन्हा एकदा महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. (Latest marathi news)

Topers Ad

Congress । काँग्रेसला मोठा धक्का! अर्ज भरताच रद्द झाली उमेदवारी, नेमकं कारण काय?

साताऱ्यात उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांना उमेदवारी दिली जाऊ शकते पण त्यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध होत आहे. श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीवर आज साताऱ्यात चर्चा होणार आहे. चर्चेसाठी शरद पवार साताऱ्यात येणार आहेत. दरम्यान, २०१९ मध्ये पोटनिवडणुकीत शरद पवारांनी पावसात सभा घेतल्याने या ठिकाणी त्यांची सत्ता आली होती.

Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली पहिली यादी; ‘या’ बड्या नेत्यांना मिळाली संधी

अशातच आता आगामी निवडणुकीत 2019ची पुनरावृत्ती होणार नाही, असा दावा उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. दरम्यान, अजूनही सातारा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे आता या ठिकाणी कोणाच्या नावाची चर्चा होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Dilip Valse Patil । ब्रेकिंग! दिलीप वळसे पाटील यांचा अपघात

Spread the love