Site icon e लोकहित | Marathi News

Sharad Pawar । मोठी बातमी! शरद पवार करणार एक दोन दिवसांत साताऱ्यातील उमेदवाराबाबत घोषणा

Sharad Pawar

Sharad Pawar । लोकसभेच्या (Loksabha election) तोंडावर मागील काही दिवसांपासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मागील काही दिवसांपासून सातारा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीनेही या मतदारसंघात उमेदवाराची घोषणा केली नाही. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. (Latest marathi news)

Politics News । राजकारणात खळबळ, काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची सून करणार भाजपमध्ये प्रवेश

२०१९ मध्ये या मतदारसंघातील पोटनिवडणुकीवेळी शरद पवारांनी भर पावसात दिलेल्या भाषणामुळे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला होता. पण यावेळी श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागला, शिवाय श्रीनिवास पाटील यांनीही आपली या मतदासंघातून माघार घेतली. त्यामुळे आगामी निवडणुकीत या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Satara Politics News । शरद पवार गटात मोठी खळबळ; या खासदाराने निवडणूक लढण्यास दिला नकार

दरम्यान या मतदारसंघातून बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, शशिकांत शिंदे आणि सुनील माने यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच उमेदवार म्हणून एका नावाची घोषणा येणाऱ्या एक-दोन दिवसांत केली जाणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार कोणाच्या नावाची घोषणा करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Chhatrapati Sambhajinagar । ब्रेकिंग! मराठा समाजाच्या बैठकीत राडा, जोरदार हाणामारी

Spread the love
Exit mobile version