शरद पवार यांनी ग्रामीण भागातील डॉक्टरांना दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला!

Sharad Pawar gave 'this' important advice to rural doctors!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( Nationalist Congress) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांच्या कर्तृत्वामुळे नेहमीच चर्चेत असतात. शरद पवार यांनी शनिवारी ( दि. १८) इंदापूर दौरा केला. यावेळी शरद पवार यांनी एका खाजगी रुग्णालयाचे (hospital) उद्घाटन केले. तेव्हा पवार यांनी ग्रामीण भागातील व इंदापूर (Indapur) तालुक्यातील सर्व डाॅक्टरांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.

उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढल्या; मशाल चिन्ह सुद्धा हातातून निसटण्या

उद्धाटना दरम्यान शरद पवार म्हणाले की, मी अनेक ठिकाणी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी जातो. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देणे माझ्यासाठी अवघड असते. मात्र, या रुग्णालयास उद्घाटन करताना शुभेच्छा देण्यास काहीही हरकत नाही. कारण, हे रुग्णालय अनेकांना दृष्टी देण्याचे काम करणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांना चांगली आरोग्यसेवा द्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.

शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना खास ऑफर; दिले शिवसेनेत येण्याचे

या कार्यक्रमाला माजी मंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर एम. के. इनामदार, इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूरचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथ चंदशिवे हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरात १०० खाटांची मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मदत करावी, अशी मागणी पवारांकडे केली.

दिल्लीश्वर येऊन दुकान उघडणार आहेत का? संजय राऊत यांची खोचक टीका,

दरम्यान, शरद पवार यांनी एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी मला माझ्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करण्यास सांगितले होते. त्यावेळी मी तात्काळ दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. पण डॉक्टरांनी मला थांबवले. तुम्हाला दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन एकदम करता येणार नाही. कारण तुमचे दोन डोळे बंद ठेवले तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चांगले नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *