Sharad Mohol Murder । पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणामुळे (Sharad Mohol Murder Case) पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्येनंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे. दरम्यान आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
LPG Price Today । ब्रेकिंग! गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवीन दर
शरद मोहोळच्या हत्येनंतर गणेश मारणे अनेक दिवसापासून फरार होता. मात्र, त्याच्या पाळतीवर असलेल्या पोलिसांनी नाशिक रोड येथून गणेश मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. संगमनेर येथून ओला-उबेर गाडीतून जात असताना पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं.
Bus Accident । चालकाच्या चुकीमुळे बसचा भीषण अपघात, २० प्रवाशी जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “शरद मोहोळ हत्या प्रकरणात आतापर्यंत 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी तपास चक्रे हाती घेत सात जणांना अटक केली होती. नंतर 15 जानेवारी रोजी आणखी 10 जणांना पनवेल आणि वाशी या ठिकाणाहून अटक केल्याची माहिती मिळाली.
Gyanvapi Masjid । कोर्टाचा मोठा निर्णय! ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी