नवरा बायको (husband wife) म्हटलं की वाद हे आलेच. जितकं ते एकमेकांवर प्रेम (love) करतात तितकेच ते एकमेकांशी भांडत असतात. मात्र हे वाद अतिशय धोकादायक असतात. अगदी शुल्लक कारणांवरून लागलेला वाद एकद्याच आयुष्य संपवून शकतो. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रामपूर येथे एक जोडप्याचा वादा झाला आहे. पण त्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची घटना मनाला दुःख देणारी, अजित पवार संतापले
माध्यमातील वृत्तानुसार, श्यामलाल आपल्या कुटुंबासोबत राहतो. शुक्रवारी त्याची पत्नी टीव्हीवर मालिका बघत होती. त्यावेळी श्यामलालने आपल्या पत्नीला टीव्ही बंद करण्यास सांगितला. अनेकदा सांगूनही पत्नीने टीव्ही बंद केला नाही. ती मालिका बघतच बसली. यावेळी संतापलेल्या श्यामलालने लायसन असलेली रायफल काढून थेट पत्नीच्या हातावर गोळी झाडली.
मोठी बातमी! पुण्यात नवले ब्रिज जवळ भीषण अपघात; ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन्..
या घटनेनंतर त्या महिलेला कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत श्यामलाल पसार झाला होता. शासकीय रुग्णालयात त्या महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेनंतर महिलेची मुलगी स्वराने पोलिसात एफआयआर दाखल केली आहे. आरोपीला सध्या अटक करण्यात आली आहे. तसेच त्याची बंदुकही जप्त करण्यात आली आहे. यादरम्यान सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.
ब्रेकिंग! लवकरच महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाची माहिती