Sayaji Shinde । ब्रेकिंग! अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

Sayaji Shinde

Sayaji Shinde । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोरंजन विश्वातून बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, बडा नेता नॉटरीचेबल; शिंदे गटात करणार प्रवेश?

सयाजी शिंदे यांच्या छातीत अचानक दुखू लागले त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. यावेळी त्यांच्या हृदयाच्या एका छोट्याशा भागाची हालचाल थोडी कमी होती असं जाणवत होतं. त्यानंतर त्यांची स्ट्रेस टेस्ट देखील करण्यात आली त्यामध्ये थोडे, छोटेसे दोष सापडले. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

Politics News । राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी, शरद पवारांनी दिला भाजपला धक्का

सध्या त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावरही अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

Viral News । उडत्या विमानात जोडप्याने खुलेआम सुरू केला रोमान्स, पाहून प्रवासी झाले थक्क; फोटोही झाले व्हायरल

Spread the love