Samruddhi Mahamarg Thane । समृद्धी महामार्गाचे काम चालू असतानाच घडली मोठी दुर्घटना! 17 जण जागीच ठार

Samruddhi Mahamarg Thane. A big accident happened while the work of Samriddhi Highway was going on! 17 people died on the spot

Samruddhi Mahamarg Thane । समृद्धी महामार्गावर सतत मोठ्या दुर्घटना होत आहेत. एक्सीडेंटचे प्रमाण या ठिकाणी मोठे आहे. दरम्यान आता ठाण्याजवळ शहरापुरी तालुक्यातील सरलांबे या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम चालू आहे. यावेळी या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम चालू असताना गार्डर मशीन कोसळल्याची या ठिकाणी घटना घडली आहे. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर चार पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

जबरदस्त फीचरसह स्मार्टफोनपेक्षाही स्वस्तात खरेदी करता येईल जिओचा नवीन लॅपटॉप, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

त्याचबरोबर या दुर्घटनेमध्ये अजून सहा जण गार्डर मशीनच्या खाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचबरोबर ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत देखील जाईल असे दादा भुसे म्हणाले आहेत. (Samruddhi Mahamarg Thane)

मोठी बातमी! ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी

ही घटना रात्रीच्या वेळी घडली असून यामध्ये जवळपास 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र यामध्ये मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Alcohol Spray | अबब! ‘या’ जिल्ह्यातील शेतकरी पिकांवर करतात देशी दारूची फवारणी; याचा फायदा होतोय का? जाणून घ्या…

Spread the love