Samruddhi Highway Accident । समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भयानक अपघात, १ जण जागीच ठार तर ३ जखमी

Samruddhi Highway Accident

Samruddhi Highway Accident । समृद्धी महामार्गावरील (Prosperity Highway) अपघाताची (accident) मालिका काही संपण्याचा नाव घेत नाही. सतत या महामार्गावर अपघात घडत आहेत. वाहनाचे टायर फुटून, वन्यप्राणी आडवे येऊन समृद्धी महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. दरम्यान सध्या देखील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

BJP West Bengal | प्रचारादरम्यान घडलं भलतंच, भाजपच्या खासदाराने प्रचार करताना जबरदस्तीने घेतला महिलेचा किस

समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा परिसरात गुरुवारी (ता. ११) सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार दिल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

Dhairyashil Mohite Patil । भाजपला सर्वात मोठा धक्का! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला राजीनामा

माहितीनुसार, आयशर मुंबईवरून कोलकाताकडे निघाला होता. यावेळी सिंदखेडराजा (Buldhana) परिसरात आयशर आला असतार पाठीमागून येणाऱ्या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात बसली की आयशर अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकला आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

Maharastra Politics । पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, भाजपला मोठं खिंडार; बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

या अपघातामध्ये आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अपघात झाल्यानंतर मोठी वाहतूककोंडी झाली होती पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

Spread the love