संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ”15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही”

Bhide

सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ”15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही, अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवले आहे, वंदे मातरम् म्हणत हे स्वातंत्र्य मिळाले आहे” असे वक्तव्य भिडे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटू शकते. (Latest Marathi News)

धक्कादायक! ठाकरे गटातील नेत्याच्या घरात घुसून हल्ला

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील दिघी परिसरात रविवारी संभाजी भिडे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी ते बोलताना म्हणाले, ‘१५ ऑगस्ट हा भारताचा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. कारण या दिवशी देशाची फाळणी झाली असल्याने सर्वांनी या दिवशी उपवास करून दुखवटा पाळावा. रवींद्रनाथ टागोर यांनी 1898 रोजी हे राष्ट्रगीत इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. त्यामुळे जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही.

केसीआर यांना मोठा धक्का! बडे नेते, माजी मंत्री, खासदार,आमदार आणि २० पेक्षा जास्त महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आपला देशाचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारत नाही, तोपर्यंत शांत बसायच नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाईसारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता आहे, असे भिडे बोलताना म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वातावरण तापू शकते.

शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेचा घेतला फडणवीसांनी खरपूस समाचार, म्हणाले; ‘त्यावेळी मी..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *