
Sambhaji Bhide । जालना : राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलन केले आहे. मागणी मान्य होत नसल्याने त्यांनी रविवारपासून औषध आणि पाणी त्यागल आहे. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडत चालली आहे. गावकऱ्यांनी त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला होता. अखेर त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी सलाईन घेतली आहे. (Jalana Protest)
आज श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे लबाडी करणार नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुमची फसवणूक करणार नाहीत. तर अजित पवार (Ajit Pawar) काळीज असणारा माणूस आहे. त्यामुळे कृपया तुम्ही तुमचं उपोषण थांबवा,” अशी विनंती संभाजी भिडे यांनी केली आहे.
Ind vs Pak । पराभवानंतरही पाकिस्तानला मोठा धक्का, दोन स्टार खेळाडू संघाबाहेर?
आम्ही आज केवळ देखाव्यासाठी आलो नाही. तर आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, ही समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत असू. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. तुम्ही मागे वळून पाहू नका. ही धर्माची समस्या असून तुमच्या तपस्येला शंभर टक्के फळ येईल, आपण मोठ्या मुत्सद्दीपणाने हे उपोषण थांबवूया. मी तुम्हाला नाउमेद करायला आलो नाही,” असे संभाजी भिडे यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अजित पवार गटातील 24 आमदारांवर होणार कारवाई
सरकारचे प्रतिनिधी घेणार भेट
काल मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली. आज सरकारचे प्रतिनिधी संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर हे मनोज जरंगे पाटील यांची भेट घेणार आहेत. जरांगे पाटील आज उपोषण मागे घेतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.