Samarjit Ghatge । भाजपला सोडचिठ्ठी देण्याआधी समरजित घाटगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा?

Samarjit Ghatge

Samarjit Ghatge । आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय पातळीवर मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे नेते समरजित घाटगे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या निर्णयामुळे भाजपला सोडण्याचे कारण आणि त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा याबद्दल समरजित घाटगे यांनी स्पष्टता दिली आहे.

Ajit Pawar । अजित पवारांची निवडणुकीआधी बारामतीकरांना साद; म्हणाले…

समरजित घाटगे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेण्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी फडणवीसांना त्यांच्या निर्णयाचे कारण सांगितले आणि “मी विधानसभेसाठी हा निर्णय घेतला आहे. राजकीय नेता म्हणून तुम्ही मला थांबवण्याचा अधिकार असला तरी, थोरले भाऊ म्हणून तुम्ही विचार करा आणि मला स्वायत्तता द्या,” असे स्पष्ट केले. यावर फडणवीस अधिक काही बोलू शकले नाहीत.

Manoj Jarange Patil । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटीलांची मोठी घोषणा!

घाटगे यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल सांगितले की, भाजपने त्यांना विधानसभा उमेदवारी नाकारली आणि विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली. “माझ्या लोकांमधून निवडून यायचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. ईडी आणि सीबीआयच्या चौकशीच्या भीतीसंदर्भात त्यांनी असेही स्पष्ट केले की, त्यांच्या कारभारात पारदर्शकता आहे आणि त्यांना कोणत्याही भीतीचा सामना करावा लागणार नाही.

Maharastra Rain । पावसाचा मोठा कहर! ‘या’ ठिकाणी जनजीवन झाले विस्कळीत; जनावरे वाहून गेली..

Spread the love