Salman Khan । बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान (Salman Khan) सतत चर्चेत असतो. त्याचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर खूप लोकप्रिय होतात. इतर कलाकारांपेक्षा सलमान चित्रपट निर्मितीसाठी जास्त मानधन घेतो. ‘दबंग’ (Dabang) या चित्रपटाने घवघवीत यश मिळाले होते. त्यानंतर निर्मात्याने ‘दबंग 2’ (Dabang 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला. सलमानचा आता लवकरच ‘दबंग 3’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधी त्यावर चर्चा सुरु आहे. मात्र, यावेळी कारण जरा वेगळे आहे. (Marathi Latest News)
इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर असणाऱ्या हेमा शर्मा (Hema Sharma) या अभिनेत्रीने सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्डवर धक्कादायक आरोप केला आहे. तिने याबाबत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने सलमान खानच्या बाऊन्सर्सनी तिला कुत्र्यासारखं बाहेर ढकललं. तिला सेटवरील जवळपास 100 लोकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली असा गंभीर आरोप केला आहे.
शरद पवारांना मोठा धक्का बसणार? जयंत पाटील भाजपच्या वाटेवर; राजकीय घडामोडींना वेग
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अभिनेत्रीने ‘दबंग 3’ चित्रपटात काम केले आहे. 2019 मध्ये ही घटना घडली असून तिने ‘दबंग 3’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेला किस्सा सांगितला आहे. तिला खूप कष्ट करून सलमान सोबत काम करण्याची संधी मिळाली. शुटिंगनंतर तिला सलमान खान सोबत एक फोटो काढायचा होता. परंतु सलमानच्या बॉडीगार्डने तिला कुत्र्यासारखं बाहेर ढकललं, तिच्या आरोपामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.