एसटी चालकाच्या आत्महत्यावर सदावर्ते यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आयुष्यबँकांचे राजकारण आणि शरद पवार…”

Sadavarte reacts to ST driver's suicide; Said, "Ayushya Bank politics and Sharad Pawar..."

एका एसटी कर्मचाऱ्याने पगार (Salary by ST employee) झाला नाही म्हणून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातुन ही धक्कादायक घटना समोर आली आहे. वेळेवर पगार न झाल्यामुळे कर्मचाऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धक्कादायक! पगार न झाल्यामुळे एसटी चालकाने आत्महत्या करत संपवले आयुष्य

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकल्यामागे बँकांचे राजकारण आणि शरद पवार यांच्या ठेवणीतले काही आधिकारी असल्याचा गंभीर आरोप यांनी यावेळी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे चर्चांना उधाण आले आहे.

ठरलं! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा १३वा हप्ता

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव सूर्यवंशी (Bhimrao Suryavanshi) असं एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते कवठेमहांकाळ बस आगारात (Kavthe Mahankal Bus Stand) चालक पदावर कार्यरत होते. मात्र त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही. भीमराव सूर्यवंशी यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा (Police system) करत आहे.

सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार! भूसंपादनासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी पूर्ण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *