Rohit Pawar । “…त्यांनी आमचं घर फोडले” , रोहित पवारांचे धक्कादायक वक्तव्य

rohit pawar

Rohit Pawar । राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) रणधुमाळीला वेग आला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार प्रचारात उतरले आहेत. आज जामखेडमध्ये झालेल्या प्रचारसभेत रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, “कोविड काळात आम्ही लोकांची सेवा केली आणि फडणवीस गाणी ऐकत होते.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का; ४० वर्षांपासून सोबत असलेल्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

फडणवीस यांनी आमचं घर फोडले. राम शिंदे यांना जिथे मत मिळाली तिथे देखील पाण्याचे टँकर दिले. लंपीचा रोग आला तेव्हा ते गायब झाले तेव्हा ते कुठल्या घरी गेले माहित नाही. असं रोहित पवार म्हणाले आहेत. सध्या रोहित पवारांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.

Sharad Pawar । ब्रेकिंग! निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा मोठा डाव; सदाभाऊ खोत यांना दिला मोठा झटका

रोहित पवार यांनी भाजपवर घणाघात करत सांगितले की, “लोकसभा निवडणुकीत भाजपने पवार साहेबांना प्रश्न विचारले, तेव्हा लोकशाही मार्गाने त्यांना उत्तर मिळाले. आम्ही कधी गुंडांसाठी फोन नाही केला, असं ते म्हणाले.” रोहित पवारांनी पुढे आश्वासन दिलं की, “आपलं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफी केली जाईल आणि लाडकी बहीण योजनेला बंद होऊ देणार नाही.” असं ते म्हणाले.

Sharad Pawar । बारामतीचे ‘दादा’ कोण? शरद पवारांनी केले सर्वात मोठे वक्तव्य!

Spread the love