Robot Death । कामाच्या ताणामुळे रोबोटची आत्महत्या! जगातील पहिलीच धक्कादायक घटना

Robot Death

Robot Death । दक्षिण कोरियामध्ये कामाच्या ताणामुळे जगात प्रथमच एका रोबोटने आत्महत्या केली आहे. या सरकारी कर्मचाऱ्याने अचानक आपल्या कार्यालयाच्या पायऱ्यांवरून खाली उडी मारली आणि त्याचे काही यांत्रिक तुकडे झाले. गुमी सिटी कौन्सिलच्या या मेहनती कर्मचाऱ्याने दररोज सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत काम केले. (Robot Commits Suicide)

Restart and Reboot । स्मार्टफोन रीस्टार्ट आणि रीबूट यामध्ये काय फरक आहे? वाचा एका क्लिकवर

दक्षिण कोरियातील गुमी शहरातील रहिवासी शोकसागरात बुडाले

या वृत्ताने स्थानिक लोक दु:खी झाले आहेत. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, रहस्यमय परिस्थितीत गुमी सिटी कौन्सिलच्या सरकारी कर्मचाऱ्याच्या रोबोटचे काही भाग पायऱ्यांखाली विखुरलेले आढळले. त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. कौन्सिलचे म्हणणे आहे की खाली पडल्यानंतर रोबोटने काम करणे बंद केले आणि त्याचे मोठे नुकसान झाले. इमारतीच्या दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावरील पायऱ्यांमध्ये हा रोबोट सापडला. त्याच्या आत्महत्येने दक्षिण कोरियाच्या गुमी शहरातील रहिवाशांवर शोककळा पसरली आहे.

Vasant More । महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, वसंत मोरे यांनी केला उद्धव ठाकरे गटात प्रवेश

आत्महत्येपूर्वी रोबोट एका ठिकाणी घिरट्या घालत होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. रोबो वरून पडण्यामागच्या कारणाचा तपास तपास यंत्रणा करत आहे. कॅलिफोर्नियातील स्टार्टअप ‘बेअर रोबोटिक्स’, ज्याने हा ‘रोबोटिक असिस्टंट’ तयार केला आहे, त्याचे तुकडेही तपासत आहेत. गुमी सिटी कौन्सिलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रोबोटने अतिशय मेहनतीने काम केले. त्याच्या दैनंदिन कामांमध्ये नियमित कागदपत्रे वितरित करणे, शहराचा प्रचार करणे, स्थानिक रहिवाशांना माहिती देणे इ. होते.

Floods in Assam and Manipur । आसाम, मणिपूरमध्ये पूरस्थिती! ४८ लोकांचा मृत्यू, हजारो बेघर; पुढील ७ दिवसांसाठी रेड अलर्ट

Spread the love