
Ritesh Deshmukh । अभिनेता रितेश देशमुख हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. सोशल मीडियावरही (Social media) तो चांगला सक्रिय असतो. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Social media viral video) या व्हिडिओमध्ये तो एका कार्यक्रमादरम्यान, ढसढसा रडताना पाहायला मिळत आहे. काय आहे यामागचं नेमकं कारण? जाणून घ्या. (Latest marathi news)
आज लातूरमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते स्वर्गीय विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. यावेळी रितेश देशमुख भाषण करताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. बोलताना तो म्हणाला की, “वडिलानंतर काकांनी साथ दिली. काका नेहमी उभे राहिले. काकांना बोलता आलं नाही. पण आज सर्वांसमोर सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका पुतण्याचं नातं कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण आज आहे”, असे म्हणत रितेश देशमुख मंचावर भावुक झाले.
“मुलगा म्हणून साहेबांनी कधीच अडवले नाही. आम्हाला त्यांनी सुट दिली होती. मुलांवर कधी कशाचा दबाव टाकू नये. त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या. साहेबांच्या पुतळ्याकडे पाहून प्रेरणा घ्यावी. विलासराव माणूस म्हणून काय होते हे समजेल. राजकारणात टीका कारा, पण व्यक्तिगत कोणावरही टीका करू नका हे विलासराव यांचे संस्कार आहेत”, असे रितेश देशमुख म्हणाला.
Mike Procter Death । क्रिकेट विश्वावर मोठी शोककळा! दिग्गज ऑलराउंडरचं निधन