Nanded Hospital । नांदेडच्या मृत्यूतांडवांनंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी केले गंभीर आरोप

Relatives of patients made serious allegations after the death row in Nanded

Nanded Hospital । नांदेड : नांदेडमधून (Nanded) राज्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospitals) 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला (Health system) जाग आली आहे. मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सरकारवर (Government) विरोधकांनी आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Nashik Onion । मोठी बातमी! अखेर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने कांदा व्यापाऱ्यांकडून संप मागे

या रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या सीटी स्कॅन, सोनोग्राफी, रक्त तपासणी सुविधा आणि औषधांचा तुटवडा (Shortage of medicines) आहे, असा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. यावरून आरोग्य सुविधांची काय स्थिती आहे, हे समजते. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण खात्याचे आरोग्य पथक चौकशीसाठी रवाना होईल. चौकशीनंतर खरे प्रकरण समोर येईल.

Boney Kapoor Sridevi Death । “श्री देवीचा नैसर्गिक मृत्यू नव्हता तर…” ५ वर्षांनंतर बोनी कपूरने सांगितलं धक्कादायक सत्य

दोषीवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिले आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांना पदावरून हटवावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तीन इंजिनं लागले तरी राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपस्थित केला आहे.

Buldhana News । खामगावात प्रकटले कथित गजानन महाराज, दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

Spread the love