Raigad Lok Sabha । खासदार सुनील तटकरेंना धक्का; रायगड लोकसभेवर भाजपचा दावा

Sunil Tatkare

Raigad Lok Sabha । सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सगळीकडे आपल्याला लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली असली तरी अजूनही राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून धुसफूस असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आज महायुतीतील जागा वाटपाचा सस्पेन्स संपणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Topers Ad

Aditya Thackeray । आदित्य ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का

दरम्यान रायगड लोकसभेवर भाजपने दावा केल्याने खासदार सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे. रायगड मतदार संघ लढण्यासाठी भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. भाजपचे धैर्यशील पाटील देखील नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Shocking News । धक्कादायक बातमी! पक्षाने तिकीट नाकारल्याने खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

धैर्यशील पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आगामी काळात रायगड लोकसभा मतदारसंघाबाबत नेमका काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baramati Lok Sabha । सर्वात मोठी बातमी! फडणवीसांच्या मध्यस्थीला यश, विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील वाद अखेर मिटला

Spread the love