
Raigad Accident News । रस्ते जसे जसे चांगले होत चालले तसे तसे अपघाताचे प्रमाण हे वाढत चालले आहे. अनेक कारणांमुळे दररोज अपघात झाल्याचे आपल्याला ऐकायला मिळत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने, जंगली जनावर आडवे आल्याने, वाहनाचे टायर फुटल्याने अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हे अपघात होतच आहेत. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Latest Martahi News)
रायगड जिल्ह्यातील माणगाव मध्ये भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. माणगाव म्हसळा मार्गावरील देवघर येथे कारचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये दोन गंभीर जखमी झाले आहेत.
Crime । काय सांगता? तब्बल 1 वर्षं आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या मुली; घटना वाचून बसेल धक्का
पुण्यातून दिवेआगार या ठिकाणी फिरण्यासाठी हे पर्यटक आले होते. मात्र मानगावच्या देवघरजवळ आल्यानंतर चालकाचे कारवारी नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र जखमी झालेल्या दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Ajit Pawar । मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत