
Politics News । सध्या राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे आमदार अपात्रतेसंदर्भात पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
Kirit Somaiya । किरीट सोमय्या उतरले पुन्हा मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
पुढच्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात
माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुढच्या आठवड्यापासून आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात करणार आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांपासून सुनावलीला सुरुवात होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये दररोज एका आमदाराची सुनावणी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
Jio Upcoming 5G Smartphone । ‘इतक्या’ स्वस्तात लाँच होणार जिओचा 5G फोन, मिळतील भन्नाट फीचर्स
ठाकरे गटांच्या आमदारांची सुनावणी आधी का?
ठाकरे गटाच्या आमदारांनी आपलं उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केल्याने आता त्यांची आधी सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष प्रत्येक आमदारांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.