Indurikar Maharaj । मुंबई : हजारोंच्या संख्येने इंदोरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) कीर्तनाला लोक गर्दी करत असतात. परंतु इंदोरीकर महाराज हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका कार्यक्रमात “सम तारखेला स्त्रीसंग केल्यावर मुलगा आणि विषय तारखेला केल्यावर मुलगी होते”, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Latest Marathi News)
Politics News । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रेवर सुनावणी घेणार
या वक्तव्यावरून त्यांच्यावर अहमदनगरमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. परंतु सत्र न्यायालयाने हा खटला रद्द केला. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाकडून इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करत संगमनेर कोर्टात खटला चालवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे इंदोरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेत गुन्हा रद्द करण्याची याचिका दाखल केली होती.
Jio Upcoming 5G Smartphone । ‘इतक्या’ स्वस्तात लाँच होणार जिओचा 5G फोन, मिळतील भन्नाट फीचर्स
आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. गुन्हा रद्द करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर पुन्हा सत्र न्यायालयात खटला चालणार आहे.
Mobile Tips : सावधान! तुटलेल्या स्क्रीनचा स्मार्टफोन वापरणं ठरू शकतं घातक; होईल मोठे नुकसान