Rahul Gandhi । काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी संपता संपत नाहीत. आता त्यांना एमपी एमएमए कोर्टाकडून (MP MMA Court) एक नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टात या प्रकरणी एक नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडणार आहे. त्यांच्यावर भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) १७ नोव्हेंबर २०२२ रोजी अकोला येथे जाणीवपूर्वक सावरकरांविरोधात (Vir Savarkar) भाष्य केले असा आरोप करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
Hafiz Saeed Son । पाकिस्तानला मोठा धक्का! मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या मुलाची हत्या?
याप्रकरणी नृपेंद्र पांडे यांनी मुख्य न्याय दंडाधिकारी तृतीय यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या विरोधातील याचिका जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी स्वीकारली आहे. तसेच हे प्रकरण एमएलए कोर्टाच्या विशेष न्यायाथीशांच्या न्यायालयात स्थानांतरित केल्याने या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सर्वात अगोदर कनिष्ठ न्यायालयाकडून हा अर्ज तक्रार म्हणून दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु त्यानंतर ही तक्रार अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचे सांगत फेटाळली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाला देखरेख याचिकेद्वारे आव्हान दिल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. एक नोव्हेंबर रोजी न्यायालय कोणता निकाल देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
World Cup 2023 । दोन दिवसात 3 सामने रद्द झाल्यानं वर्ल्डकप सामन्यांच टेन्शन वाढलं