Site icon e लोकहित | Marathi News

Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, पोलिसांकडून हुल्लडबाजांवर लाठीचार्ज; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Rada again at Gautami's program, police lathi charge rioters; What exactly happened?

Gautami Patil । परभणी : गौतमी पाटील हे प्रत्येक घराघरात पोहोचलेलं नाव आहे. तिच्या कार्यक्रमांना (Gautami Patil Programs) तुफान गर्दी असते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. तिचे लाखो चाहते (Gautami Patil Fans) आहेत. फक्त तरुणच नाही तर तिचे कार्यक्रम सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. परंतु तिच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा ठरलेलाच असतो. अनेकदा परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर पोलिसांना तरुणांवर लाठीचार्ज करावा लागतो. (Latest Marathi News)

Accident News । भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसचा टँकर पलटी

गौतमी पाटील नुकत्याच झालेल्या परभणीतील कार्यक्रमामुळे चर्चेत आली आहे. परभणीत भाजप विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमाचं केले होते. यावेळी गौतमीचा डान्स आकर्षण ठरला. शेकडो लोकांनी कार्यक्रमासाठी गर्दी केली होती. काही लोकांनी हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. खुर्च्या फेकफेकी, तोडफोड करण्यात आली.

Politics News । शरद पवारांच्या घरी पवार-ठाकरे यांच्यात जवळपास दीड तास चर्चा; समोर आली महत्त्वाची माहिती

गोंधळाचे रूपांतर राड्यात झाले. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत हुल्लडबाजांवर सौम्य लाठीमार करावा लागला. जवळपास अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरु होता. गौतमी आणि तिचे सहकारी व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून गेले. गोंधळ शांत झाल्यांनतर पुन्हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. कितीही कडक बंदोबस्त असला तरी गौतमीच्या कार्यक्रमात राडा होणारच याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

Manoj Jarange Patil | आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेण्याची शक्यता, मात्र…

Spread the love
Exit mobile version