Pune Rain Alert । पुणे शहर आणि जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार दणका दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील चार प्रमुख धरणं भरली आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वसरगाव आणि टेमघर धरणं आता 100% क्षमतेने भरली असून, खडकवासला धरण 90.39% भरले आहे. हवामान खात्याने येत्या आठवड्यात यापुढेही मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
BMW ची सर्वात शक्तीशाली XM Label Red भारतात लाँच, फक्त एकच कार उपलब्ध
जिल्हा प्रशासनाने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रात जाण्यापासून रोखण्याची सूचना दिली आहे. विशेषत: मुळा व पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासन सतर्क राहण्याचा सल्ला देत आहे.
Ajit Pawar l अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचे मोठे वक्तव्य!
हवामान खात्याने 24 ते 29 सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, ज्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सखल भागातील नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी लागेल. संबंधित प्रशासनाने मुठा आणि पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये उतरू नये, असे आवाहन केले आहे. सखल भागातील नागरिकांनी नदीपात्रात काही वस्तू किंवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्याची सुचना देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना आगामी काळात अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे, कारण पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटांची पूर्वकल्पना घेणे महत्वाचे आहे.
Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा