Pune Crime News । पुणे हादरलं! दिवसाढवळ्या चिकन विक्रेत्याची दहशत, रस्त्यात अनेकांवर सुऱ्याने केला हल्ला; पोलीस जखमी

Pune Crime News

Pune Crime News । पुण्यात दिवसाढवळ्या दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अनेक मोठमोठे गुन्हे घडतच आहेत. यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या देखील पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका चिकन विक्रेत्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर अचानक सुरा घेऊन हल्ला केला असल्याची घटना घडली आहे.

Maharashtra Politics । “राज्यात पुन्हा होणार अनपेक्षित राजकीय भूकंप”, भाजपच्या बड्या मंत्र्यांचा दावा

या घटनेमध्ये दोन पोलिसांसह काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पुणे शहरातील नऱ्हे परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली. पुण्यात सतत गुन्हेगारीच्या अशा घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

NCP MLA Disqualification । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद पवारांना एक चूक पडणार महागात, हातातून जाणार पक्ष?

या घटनेनंतर पोलिसांनी चिकन विक्रेत्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमवारी दुकानात बसून सुरा फिरवत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. यामुळे मंगळवारी आरोपीची हिंमत अजूनच वाढली आणि त्याने थेट रस्त्यावर उतरून नागरिकांवर सुरीने हल्ला करण्यास सुरुवात केली.

Ayodhya Ram Mandir । सर्वात मोठी बातमी! रामलल्लाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Spread the love