Pune Crime । पुण्यात धक्कादायक प्रकार, किरकोळ कारणावरून २० जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर केला हल्ला

Pune Crime

Pune Crime । पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र देशाची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गॅंग सक्रिय आहे. त्याचबरोबर गोळीबाराच्या देखील घटनांमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या देखील पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Supriya Sule । शरद पवारांच्या ‘काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या..

पुण्यातील महंमदवाडी परिसरात एका सोसायटीबाहेर किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वीस जणांच्या टोळक्याने दोन जणांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Eknath Shinde । पक्ष विलिनीकरणाच्या शरद पवारांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मागच्या काही दिवसापासून वाहनांच्या तोडफोडीच्या घटना पुण्यात घडल्या होत्या त्यानंतर आता तरुणांमध्ये देखील हाणामारीची घटना समोर आली आहे. यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ajit Pawar । भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले, बड्या नेत्यांना सुनावलं; नेमकं काय घडलं?

Spread the love