Pune Crime । पुण्यात भयानक मर्डर! संपूर्ण कुटुंब अटकेत; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

Crime

Pune Crime । पुण्यातील आयुष कोमकर हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले असून, या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये आंदेकर कुटुंबातील जवळपास संपूर्ण सदस्यांचा समावेश आहे. 5 सप्टेंबर रोजी घडलेल्या या हत्याकांडानंतर पुणे पोलिसांनी जोरदार तपास करत एका मागोमाग एक आरोपी ताब्यात घेतले.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी बंडू आंदेकर यांचा मुलगा कृष्णा आंदेकर हा पोलिसांना स्वतः शरण आला. त्यानंतर त्याला पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करून गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

इतर आरोपींमध्ये बंडू आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, मित पाठोळे आणि सुजल मिरगू यांचा समावेश आहे.

काल (15 सप्टेंबर) रोजी या सर्व आरोपींना मकोका न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. “आम्हाला अंघोळ, ब्रश करू दिले नाही, मारहाण करून जबरदस्तीने सही घेतली,” असा दावा आरोपींकडून करण्यात आला. कोर्टाने याची दखल घेत पोलिसांना आरोपींना मूलभूत सुविधा देण्याचे आदेश दिले.

सरकारी वकिलांनी शस्त्र पुरवठा, आर्थिक मदत यांचा तपास आवश्यक असल्याचे सांगितले. आरोपींच्या वकिलांनी मात्र, फक्त नातेसंबंधावरून अटक केल्याचा युक्तीवाद केला. वृंदावनी वाडेकर यांनीही पोलिसांवर गैरवर्तनाचे आरोप केले.

Spread the love