Pune Covid News । सध्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वच सक्रिय झाले आहेत. कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराचा मागोवा घेणे देखील तीव्र केले जात आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दरम्यान आता, आज पुण्यातही या कोरोनाच्या या प्रकारचे नवीन रुग्ण आढळले आहेत. पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान केले जात आहे. (Pune Covid Cases)
Ajit Pawar । बारामतीतील कार्यक्रमातून अजित पवार यांनी केली सर्वात मोठी घोषणा!
देशातील कोरोनाची स्थिती
गेल्या 24 तासांत भारतात कोविड-19 ची 752 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,420 वर पोहोचली आहे. 21 मे 2023 नंतर देशात एकाच दिवसात कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झालेली ही सर्वाधिक संख्या आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,964) आहे.
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड-19 मुळे गेल्या 24 तासांत केरळमध्ये दोन तर राजस्थान आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,44,71,212 झाली आहे. राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्के आहे, तर मृत्यू दर 1.19 टक्के आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.
Tanaji Sawant Car Accident । सर्वात मोठी बातमी! आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारचा भीषण अपघात