पीएसआयने Dream 11वर जिंकले दीड कोटी रुपये, त्यानंतर चर्चेत आला मात्र आता…

Dream 11

Dream 11 | सध्या अनेक जण पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग शोधतात. घरबसल्या आपल्याला पैसा कसा कमवता येईल याकडे सर्वांचे लक्ष असते. यामुळे अनेक जण काही ऑनलाईन गेम देखील खेळतात यामधून काही जण चांगले पैसे कमावतात तर काही जणांचा मात्र या ठिकाणी पैसा देखील जातो. या गेमपैकी एक गेम म्हणजे ड्री Dream 11 गेम यामध्ये अनेक जण गेम खेळून चांगले पैसे कमवत असल्याच्या बातम्या मागच्या काही दिवसातून येत आहेत. सध्या देखील अशीच एक बातमी समोर.

Sharad Pawar । शरद पवारांनी केले गौतमीच्या कार्यक्रमाबद्दल मोठं विधान, म्हणाले; “गौतमी पाटीलच्या नृत्याचा…”

पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक असलेले सोमनाथ झेंडे हे Dream 11वर करोडपती झाले आहेत. नुकताच झालेल्या बांगलादेश विरुद्ध इंग्लंड त्यांच्या ड्रीम इलेव्हनची टीम अव्वल आली. त्यातून सोमनाथ झेंडे यांना दीड कोटी रुपये मिळाले आहेत. यामुळे त्यांची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. मात्र आता त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mia Khalifa । पॅलेस्टाईनला पाठिंबा देणे मिया खलिफाला पडले महागात! नोकरीवरुन केली हकालपट्टी

सोमनाथ झेंडे यांची चौकशी होणार आहे. बक्षीसाच्या दीड कोटी मुळे आता झेंडे यांना खात्यांतर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण ऑनलाईन गेमिंगमुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात भरकटचालली आहे. फसवणुकीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढतच चालले आहे. त्याचवेळी पिंपरी चिंचवड मधील पोलीस निरीक्षक सोमनाथ झेंडे यांना खेळण्याचा मोह झाला. त्यामुळे आता डीएसपी त्यांची चौकशी करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांना मिळणार मोठी जबाबदारी

Spread the love