Site icon e लोकहित | Marathi News

राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच प्रियांका गांधी संतापल्या; म्हणाल्या, “देशाचा पैसा लुटणाऱ्यांच्या…”

Priyanka Gandhi was furious as Rahul Gandhi's candidacy was cancelled; Said, "Those who loot the country's money..."

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला. मात्र दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता यांनतर प्रियांका गांधी यांनी ट्विट करत संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

प्रियांका गांधी नेमकं ट्विटमध्ये काय म्हणाल्या आहेत?

नीरव मोदी घोटाळा – 14,000 कोटी

ललित मोदी घोटाळा – 425 कोटी

मेहुल चोक्सी घोटाळा – 13,500 कोटी

देशाचा पैसा लुटणाऱ्यांच्या मदतीला भाजप का उतरला आहे? ते चौकशीपासून का पळत आहे? यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालते का? असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार यांचं लग्न नेमकं कसं जुळलं? यासाठी कोणी पुढाकार घेतला; जाणून घ्या त्यांच्या लग्नाबद्दल काही खास माहिती

Spread the love
Exit mobile version