Post Office Saving Schemes । पोस्ट ऑफिसची पती-पत्नीसाठी शानदार योजना, होईल 59,400 रुपयांचा फायदा

Post Office's brilliant scheme for husband and wife will benefit Rs 59,400

Post Office Saving Schemes । पोस्ट ऑफिसकडून (Post Office) अनेक छोट्या बचत योजना चालवण्यात येतात. ज्यामुळे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते त्याशिवाय पोस्टाच्या या योजनांमध्ये (Post Office Schemes) तुम्हाला चांगला परतावा मिळतो आणि जोखीमही कमी घ्यावी लागते. त्यामुळे अनेकजण पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. (Latest Marathi News)

Politics News | ‘या’ कारणास्तव काका- पुतण्याची भेट झाली असावी, भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

त्यापैकीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम (Monthly Saving Scheme). या योजनेच्या माध्यमातून पती आणि पत्नीला कमाई करता येते. जर पती आणि पत्नीने या योजनेत गुंतवणूक केली तर त्यांना वार्षिक 59,400 रुपयांचा फायदा होईल. तर त्यांना महिन्याला 4950 रुपयांचा फायदा होईल. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तरपणे.

Google Maps Offline । बिनधास्त फिरायला जा! इंटरनेटशिवायही ‘असे’ चालेल गुगल मॅप

जाणून घ्या संपूर्ण योजना

महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सिंगल आणि जॉइंट अशा दोन्ही प्रकारे खाते चालू करता येते. वैयक्तिक खाते उघडत असताना तुम्ही या योजनेत कमीत कमी 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकता. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतात.

Politics News । राज्यामध्ये पुन्हा मोठा राजकीय भूकंप? अजित पवार-शरद पवारांच्या भेटींवर चर्चांना उधान; काँग्रेस नेत्याचे मोठे वक्तव्य

जाणून घ्या योजनेचे फायदे

या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दोन किंवा तीन लोकांना मिळून संयुक्त खाते चालू करता येते. हे खाते कधीही गुंतवणूकदारांना एकल खात्यात रूपांतरित करता येते. त्याशिवाय एकल खाते संयुक्त खात्यात रूपांतरित करता येते. त्यासाठी तुम्हाला एक अर्ज द्यावा लागतो.

Independence Day । सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑगस्टपासून सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व वैद्यकीय सेवा मोफत

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 6.6 टक्के दराने वार्षिक व्याज देण्यात येत आहे. तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजाच्या आधारे परतावा मोजण्यात येतो. यात तुमचा एकूण परतावा वार्षिक आधारावर असतो. त्यामुळे प्रत्येक महिन्यानुसार त्याचे 12 भाग करण्यात येतात. हा एक भाग प्रत्येक महिन्याला मिळवता येतो. समजा तुम्हाला त्याची मासिक आधारावर गरज नसल्यास ही रक्कम मुद्दलात जोडली तर त्यावर व्याज दिले जाते. त्यामुळे आजच पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करून लाभ घ्या.

राजकीय हालचालींना वेग! शरद पवार आणि अजित पवारांची गुप्त बैठक

Spread the love