
Politics News । ऐन निवडणूक (Loksabha election) काळात राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला गळती लागली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
Devendra Fadnavis । ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंबाबतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
काँग्रेसला धुळ्यामधे मोठा धक्का बसला आहे. नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष, तुषार शेवाळे यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उमेवारीवरून नाराज असल्याने त्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. निवडणुकीच्या काळात बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तुषार शेवाळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
मोठी गोष्ट म्हणजे फक्त तुषार शेवाळेच नाही तर त्याच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने मागच्या काही दिवसापासून तुषार शेवाळे नाराज होते आणि अखेर त्यांनी भपमध्ये प्रवेश केला.
Rain Update । अवकाळी पावसाचा कहर! अंगावर वीज पडून ५ जणांचा मृत्यू