Politics News । राजकारणात खळबळ, काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची सून करणार भाजपमध्ये प्रवेश

Devendr fadanvis

Politics News । सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. कोणता नेता कधी पक्ष सोडेल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. दरम्यान मागच्या काही दिवसापासून काँग्रेसला चांगलीच गळती लागली आहे. काँग्रेचे अनेक नेते, पध्दीकरी इतर पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. सध्या देखील एक मोठी बातमी समोर आली आहे.

Satara Politics News । शरद पवार गटात मोठी खळबळ; या खासदाराने निवडणूक लढण्यास दिला नकार

Topers Ad

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्या उद्या मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar । ब्रेकिंग! मराठा समाजाच्या बैठकीत राडा, जोरदार हाणामारी

राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीने काँग्रेसचे आणखी एक नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र या विषयावर अर्चना पाटील चाकूरकर यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Vasant More । मोठी बातमी! वसंत मोरेंचा मास्टर प्लॅन आला समोर

Spread the love