
Pankaja Munde । भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा (Vaidyanath Cooperative Sugar Factory) तब्बल 19 कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी (GST) न भरल्यामुळे नोटीस दिली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी गावागावातून पैसा गोळा केले होते. अशातच आता त्यांना पुन्हा एकदा नोटीस आली आहे. (Latest marathi news)
या कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (Provident Fund) तब्बल ६१ लाख ४७ हजार रुपये रक्कम थकवले असल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम न भरल्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने (Employees Provident Fund Offices) त्यांच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे. इतकेच नाही तर मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद आहे.
Pune Accident । भीषण अपघात! राष्ट्रीय महामार्गावर तीन जणांचा होरपळून मृत्यू
कारखाना बंद असल्याने या साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे भरली नाही. त्यामुळे ही नोटीस दिली आहे. हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, जीएसटीची नोटीस आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पैसे जमा केल्यानंतर पंकजा मुंडे भारावून गेल्या होत्या. त्यांनी म्हटले होते की, तुमचे प्रेम माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील अकाऊंटमध्ये जमा करा. तेच माझ्यासाठी खूप गरजेचे आहे. मला तुमच्याकडून रक्कम घेणं योग्य वाटत नाही. कारण माझा स्वाभिमान मला ते करू देत नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.