
IND VS PAK । आशिया कप (Asia Cup) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. काल भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) असा सामना रंगला होता. या सामन्यांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु पावसामुळे सर्वांचा हिरमोड झाला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय संघाला 48.5 षटकांमध्ये केवळ 266 धावा करता आल्या. (Latest Marathi News)
पावसामुळे पाकिस्तानचा डाव झाला नाही. खूप वेळ वाट पाहून पंचांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केले. त्यानंतर पाकिस्तानच्या युवा खेळाडूने गैरवर्तन केल्याचे पाहायला मिळाले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा बॉलर हॅरिस रॉफ (Harris Roff) याने भारतीय संघाचा स्टार खेळाडू ईशान किशनला (Ishan Kishan) आऊट केले. त्यानंतर त्याच्याकडे पाहत चुकीच्या पद्धतीने हातवारे केले, असे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
Bhiwandi Building collapses । भिवंडीत दुमजली इमारत कोसळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर पाच जखमी
संघाची अवस्था नाजूक असताना ईशानने 81 बॉलमध्ये 82 धावा केल्या. यात त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूने त्याला चल निघ अशा पद्धतीने हातवारे केले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या खेळाडूला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
Accident News । भाजप माजी आमदाराच्या मुलाचा भीषण अपघात! कारचा अक्षरशः चुराडा, आमदार मुलाचा हातच..