Ajit Pawar । “.. तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होतील”, भाजपने अट ठेवल्याचा ‘या’ बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

".. Only then Ajit Pawar will become the Chief Minister", sensational claim of 'this' great leader that BJP has set a condition

Ajit Pawar । मुंबई : अजित पवार यांनी अचानक उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पक्षातील (NCP) नेत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा दावा विरोधी पक्षाकडून केला जात आहे. (Latest Marathi News)

Agriculture News । शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शेततळ्यासाठी अर्ज सुरु; ‘या’ ठिकाणाहून करा अर्ज

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी देखील मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अजित पवारांसमोर ठेवली आहे. त्यामुळे अजित पवार हे शरद पवारांची सतत भेट घेत आहेत,” असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

Tomato Rate । शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! टोमॅटोचे वाढते भाव पाहता टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्याचा सरकारने घेतला निर्णय

पुढे ते म्हणाले की, “हा सर्व खुर्चीसाठी चाललेला प्रयत्न आहे. परंतु शरद पवार यांचा निर्णय बदलेल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. ते आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत असा गोंधळ निर्माण झाला आहे. परंतु शरद पवार यांच्या बीडमधील सभेनंतर तो दूर होईल”, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

Weather Update । राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक! विजांच्या गडगटांसह ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

Spread the love