Site icon e लोकहित | Marathi News

Onion Rate । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! कांद्याचे भाव क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांनी वाढले

Good news for farmers! Onion prices increased by Rs 500 to Rs 700 per quintal

Onion Rate । मागच्या काही दिवसापूर्वी कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकरी वर्ग चांगलाच चिंतेत होता. मात्र आता सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागच्या आठवड्याभरात कांदा भाव क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या बाजारामध्ये कांद्याचे भाव कमी झाले आहेत त्यामुळे कांद्याचे दर सुधारले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Bhimashankar Temple । भीमाशंकरला दर्शनाला जाताय? एकदा ही नियमावली पहाच

यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा जणू फुकट विकल्यासारखा विकला होता. बऱ्याच शेतकऱ्यांनी तर कांद्याच्या उभ्या पिकात भाव नसल्याने रोटावेटर फिरवले होते. तसेच काही शेतकऱ्यांनी कांदा जाळून देखील टाकला होता. सध्या मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाली असून कांद्याला चांगला दर मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Onion Rate)

Reserve Bank of India । मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने ‘या’ चार बँकांना ठोठावला दंड, केली मोठी कारवाई

दरम्यान, आता पुढील काळामध्ये कांद्याची बाजारातील आवक कमी होत जाणार आहे. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी 1500 ते 2000 रुपयांचा भाव मिळतोय. त्याचबरोबर गुणवत्तेच्या कांद्याचा भाव काही बाजारामध्ये 2500 रुपयांवर देखील गेला आहे यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे.

मोठी बातमी! पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी सरकारमध्ये हालचाली सुरु, जाहीर केली नवीन यादी

Spread the love
Exit mobile version