सरकारने नुकतीच मनरेगा सिंचन योजनेअंतर्गत मागेल त्याला विहीरीसाठी अनुदान मिळण्याची घोषणा केली होती. यासाठी या योजनेतील काही अटी शिथील देखील करण्यात आल्या होत्या. आता सरकारने ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मागेल त्याला शेततळ्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. तसेच या योजनेसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात सुद्धा वाढ करण्यात आली आहे.
राजू शेट्टी यांचा सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले,” शेतकऱ्यांकडून लुटलेला पैसा राजकारणासाठी…”
राज्यसरकारची ( State Government) मागेल त्याला शेततळे ही योजना आधीपासूनच सुरू होती. या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ देखील घेतला होता. परंतु, कोरोनाकाळात महाराष्ट्र सरकारने ही योजना बंद केली होती. आता मात्र हीच योजना ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना’ ( CM Shshwat Sinchan Yojana) या नावाने पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी घेतली थेट जलसमाधी; नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे किमान साठ गुंठे जमीन असणे आवश्यक आहे. तसेच योजनेचा लाभ घेताना दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती महाडीबीटी पोर्टल वर देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत 13 हजार 500 शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्यासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
गौतमी पाटीलने अर्धवट का सोडलं शिक्षण? का ठेवले लावणी क्षेत्रात पाऊल? वाचा सविस्तर माहिती