ताप (fever) आल्यावर आपण थर्मामीटरने ताप चेक करतो. व्यक्तीला किती ताप आहे हे थर्मामीटरमुळे (thermometer) आपल्याला सहज समजते. मात्र हे थर्मामीटर प्रत्येकाच्या घरी उपलब्ध नसते. मात्र आता टेन्शन घेण्याची गरज नाही. आता ताप आल्यास थर्मामीटरची गरज भासणार नाही. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या टीमने मोबाईलमध्ये फिव्हरफोन नावाचे अॅप विकसित केले आहे. (An app called feverphone in mobile) हे कोणत्याही नवीन हार्डवेअरची गरज न पडता स्मार्टफोनला थर्मामीटरमध्ये बदलते.
भारतीय वंशाच्या एका प्राध्यापकानेही हे अॅप तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आता या अॅपचा लोकांना चांगला फायदा होणार असल्याचे म्हंटले जात आहे. अहवालानुसार, विद्यापीठाचे प्राध्यापक श्वेताक पटेल हे संशोधन संघाच्या शोधनिबंधाचे वरिष्ठ लेखक आहेत. IANS ने लिहिले आहे की, त्यांच्या टीमने सुमारे 37 रूग्णांवर Feverfone ची चाचणी केली. असा दावा केला जातो की अॅपने शरीराचे तापमान इतर थर्मामीटरपेक्षा अधिक अचूकतेने मोजले जाते.
हे पहिले अॅप आहे जे सध्याच्या फोन सेन्सर आणि स्क्रीनच्या मदतीने लोकांचा ताप मोजू शकते. हा अभ्यास जर्नल प्रोसिडिंग्स ऑफ द एसीएममध्ये प्रकाशित झाला आहे. ज्या रुग्णांवर Feverfone अॅपचा वापर करण्यात आला त्यांनी फोन पॉइंट-अँड-शूट कॅमेरासारखा धरला. रुग्णांनी त्यांच्या कपाळावर 90 सेकंद टचस्क्रीन ठेवली. Feverfone अॅप 0.23°C च्या सरासरी त्रुटीसह रुग्णाच्या शरीराच्या तापमानाचा अंदाज लावतो असे म्हटले जाते.