
Nitin Desai suicide । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःच जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे . कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी स्वतःच आयुष्य संपवल आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (Well-known art director Nitin Desai committed suicide)
Congress | “शिवसेना-राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार”; मुख्यमंत्र्यांच्या विधानाने मोठी खळबळ
त्याच्या निधनामुळे कलाविश्वाला अत्यंत मोठा धक्का बसला आहे. कला विश्वातील दिग्गज व्यक्तीने टोकाचा निर्णय घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी स्वतःचे जीवन संपवल्यानंतर पोलीस याबाबत अधिकची चौकशी करत आहेत. त्यांनी स्वतः उभारलेल्या एन. डी स्टुडिओमध्ये शेवटचा श्वास घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सिनेविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. (Nitin Desai suicide)
दरम्यान, नितीन देसाई यांनी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश करण्याआधी मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी 1987 पासून चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली आणि यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही मात्र त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
Milk Rate । म्हशीच्या दुधाला मिळाला चक्क 98 रुपये दर; कुठे मिळाला हा दर? जाणून घ्या