Nilesh Lanke । आज शरद पवार गटात प्रवेश करणार? निलेश लंके यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणात काहीही होऊ…”

Nilesh Lanke

Nilesh Lanke । सध्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या या चर्चांनवर निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले, राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकतं, असं ते म्हणालेत. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.

Accident News । भीषण अपघात! भरधाव कारने १० ते १२ जणांना चिरडलं; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Ads

त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणूक लढण्याबाबत आमचं काहीही नियोजन नाही. माझं याबाबत कुणाशीही काहीही अधिकृत बोलणं झालेलं नाही, असं निलेश लंके म्हणाले आहेत. दरम्यान, निलेश लंके यांच्या पुस्तकाचं आज पुण्यात प्रकाशन होत आहे. शरद पवारांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होईल, आणि या कार्यक्रमवेळीच निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Pratibhatai Patil Health । सर्वात मोठी बातमी! देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत खालावली; रुग्णालयात उपचार सुरु

आज पुस्तक प्रकाशित होणार

कोरोना काळ खूप भयंकर होता या काळात निलेश लंके यांनी जनतेसाठी खूप मदत केली आहे. निलेश लंके यांनी कोरोना काळातील चांगले आणि वाईट अनुभव आलेले एक पुस्तक लिहिलं आहे. निलेश लंके यांनी या पुस्तकात सगळे अनुभव लिहिले आहेत. हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. आपण पुस्तक वाचून याबाबत आपलं मत मांडव असं आवाहन निलेश लंके यांनी केलं.

Lok Sabha Election । अशोक चव्हाणांचा काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

Spread the love