गूगलवर ‘हे’ नंबर्स कधीच करू नका सर्च, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Never search 'these' numbers on google, otherwise you can get big loss

सध्या कोणत्याही गोष्टीची माहिती घ्यायची म्हंटली की आपण गूगलवर सर्च करतो. गुगलवरती आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. मात्र दिवसेंदिवस सायबर क्राईमचा (Cyber Crime) धोका वाढत चालला आहे. त्यामुळे गूगलवर कोणतीही माहिती सर्च करण्याआधी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. विशेषतः काही नंबर्स गूगलवर सर्च करणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते.

रामदेव बाबा 100 तरुण तरुणींना देणार सन्यास; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

बँकेसंबंधी छोट्या-मोठ्या समस्या दूर करण्यासाठी आपण कस्टमर केअरकडे धाव घेतो. यासाठी आपण बऱ्याचदा बँकांचे कस्टमर केअर नंबर गूगल वर सर्च करतो. यावेळी गडबडीत आपण दिसेल ती वेबसाईट उघडतो आणि तिथेच सगळा घोळ होतो! या वेबसाईटवरील कस्टमर केअरचा नंबर आपण डायल करतो आणि क्षणात आपले बँक खाते (Bank Account) खाली होते.

पहिल्यांदा रडतोय आणि नंतर लगेचच हसतोय, नक्की हा मुलगा आहे तरी कोण? जाणून घ्या त्याच्याबद्दल माहिती

खरंतर सायबर क्राईम करणारे लोकांनी फेक म्हणजेच खोट्या व फसव्या वेबसाईटचे जाळे विणलेले असते. बऱ्याचदा आपण गडबडीत शहानिशा न केल्याने त्यात अडकतो. यावेळी आपल्या मोबाईल नंबरवरून आपली बँकिंग माहिती काढून हे लोक त्या माहितीचा दुरुपयोग करतात.

शरद पवारांचा दाढीतला रुबाब तुम्ही पाहिलाय का; साहेबांच्या तरुणपणीचा फोटो होतोय व्हायरल

यामध्ये आपले फार मोठे नुकसान होते. मागच्या वर्षात अशाप्रकारे तब्बल 5000 लोकांना गंडवले असल्याच्या घटना घडल्या आहेत. फक्त या पद्धतीनेच नाही तर टॉप सर्च मधील फेक जाहिराती व फसव्या शॉपिंग वेबसाईट्स मधून सुद्धा आजकाल लोकांची फसवणूक केली जात आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याची शिवसेनेच्या मुख्य नेते पदावरून हाकलपट्टी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *