Munawar Faruqui । स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर फारुकी याने त्याच्या स्टँडअप दरम्यान कोकण, महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी वापरलेल्या भाषेमुळे वाद वाढला. मुनव्वर याच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत त्याने माफी मागावी अशी मागणी केली आहे. वाढता वाद पाहता मुन्नावर फारुकी याने आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. (Munawar Faruqui News)
Mumbai Crime । मुंबई हादरली! फक्त 30 रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या, नेमकं काय घडलं?
मुनव्वर फारुकी याने ‘एक्स’ या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. तो म्हणाला, “मी येथे काहीतरी खुलासा करण्यासाठी आलो आहे. काही काळापूर्वी एक कार्यक्रम झाला होता, ज्यामध्ये प्रेक्षकांशी संवाद साधला असता, कोकणाबद्दल काहीतरी समोर आले होते. मला माहित आहे की तळोजा येथे कोकणातील बरेच लोक राहतात. कोकणातील माझे अनेक मित्रही तिथे राहतात, पण माझे शब्द संदर्भाबाहेर काढले गेले. एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून माझा हेतू कोणालाही दुखावण्याचा नाही.”
Ajit Pawar । ‘या’ दोन शहरात अजित पवार यांच्या जीवाला धोका; धक्कादायक माहिती आली समोर
त्याचबरोबर पुढे मुनव्वर म्हणाला, “लोकांना वाटतंय की त्याने कोकणची आणि कोकणात राहणाऱ्या लोकांची चेष्टा केली, पण त्याचा असा कोणताही हेतू नव्हता. त्याला कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या आणि त्याच्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्वांची जाहीर माफी मागतो.
Bjp । ब्रेकिंग! भाजपकडून 288 विधानसभा जागांसाठी फॉर्म्युला निश्चित?; बैठकीत मोठा निर्णय
कोकणावर खूप खूप प्रेम आणि माझी माफी❤️ pic.twitter.com/pUSPYuZ9Kf
— munawar faruqui (@munawar0018) August 12, 2024