
OBC Reservation । मागील काही दिवसांपासून आरक्षणावरून (Reservation) राज्याचे वातावरण तापले आहे. अगोदर मराठा समाज त्यानंतर ओबीसी समाजाकडून आंदोलन सुरु होते. चंद्रपूर येथे मराठ्यांना (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी १९ दिवसांपासून ओबीसी नेते रवींद्र टोंगे यांच्यासह दोन सहकाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. परंतु आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत काल ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. ‘ओबीसींच्या आरक्षण कमी होऊ देणार नाही’, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आंदोलनस्थळी जात आंदोलनकर्त्यांना पाणी पाजून आंदोलन मागे घेऊन आरक्षणाचा (OBC Reservation Protest) पेच काहीसा सोडवला. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेले आंदोलन शांत झाले आहे.
Taarak Mehta । चाहत्यांना मोठा धक्का! जेठालालची मालिकेतून होणार एक्झिट, स्वतःच दिली माहिती
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. परंतु मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांविरोधात उभा आहे, अशा प्रकारची परिस्थिती तयार होऊ नये, यासाठी सरकार काळजी घेत आहे. मराठा समाजाचीही तशीच अपेक्षा असून समाजात भेदभाव निर्माण होईल, असा निर्णय सरकार घेणार नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Shivsena । बिग ब्रेकिंग! राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव