राष्ट्रवादीत हालचालींना वेग.. शरद पवार, सुप्रिया सुळेंचे दौरे रद्द; जयंत पाटील यांची उचलबांगडी होणार?

Ajit Pawar

लवकरच राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) हालचाली सुरु आहेत. मागील काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदांमध्ये नाही तर पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे अजित पवार हे नाराज आहेत, अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या समर्थकांनीही त्यांना प्रदेशाध्यक्षपद द्यावे ही मागणी केली होती. (Latest Marathi News)

बापरे! 24 कोटींचा रेडा, सलमान खानसह अनेक सेलिब्रेटींनी लगावली बोली

याच पार्श्वभूमीवर आज सकाळी सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), हसन मुश्रीफ, अमोल कोल्हे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दौलत दरोडा, किरण लहामाटे आणि दिलीप वळसे पाटील आदी नेत्यांनी अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी या भेटीदरम्यान प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे यांनीही काही दौरे पुढे ढकलल्याचे सूत्रांकडून सांगितले आहे.

बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत! बुलढाण्यात केला अनोखा प्रयोग

त्याशिवाय आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आज शरद पवार यांची बारामतीत भेट घेणार असून ते आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षपदाचाही निर्णय आजच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर अजित पवार यांची नाराजी दूर झाली नाही तर आगामी निवडणुकीत त्याचा पक्षाला फटका बसू शकतो.

‘या’ पॅनकार्डधारकांना होणार फायदा! आयकर विभागाने दिला मोठा दिलासा

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *